मुकी बिचारी जनता, कुणीही हाका... या म्हणीचा प्रत्यय सध्या सातारा शहर परिसरात पाहायला मिळत आहे. नेत्यांचा वाढदिवस असो किंवा एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार असो. भव्य फ्लेक्स, कट आउट उभारला गेलाच पाहिजे. आणि त्यातही अपेक्षा अशी की तुझ्यापेक्षा माझा फ्लेक्स मोठा लागला पाहिजे. या चकमकीतून सातारा शहर परिसरात मोकळी जागा सध्या नजरेपुढे पाहायला मिळणे अवघड झाले आहे.
सातारा : मुकी बिचारी जनता, कुणीही हाका... या म्हणीचा प्रत्यय सध्या सातारा शहर परिसरात पाहायला मिळत आहे. नेत्यांचा वाढदिवस असो किंवा एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार असो. भव्य फ्लेक्स, कट आउट उभारला गेलाच पाहिजे. आणि त्यातही अपेक्षा अशी की तुझ्यापेक्षा माझा फ्लेक्स मोठा लागला पाहिजे. या चकमकीतून सातारा शहर परिसरात मोकळी जागा सध्या नजरेपुढे पाहायला मिळणे अवघड झाले आहे. सातारा शहरातील पोवई नाका, बस स्थानक, राजवाडा, मोती चौक आणि आता राहिलीसुरली राजवाडा चौपाटी आणि गोल बागे नजीकचा परिसर या भव्य फ्लेक्सने व्यापून गेला आहे.
एखाद्या दुकानाचे किंवा शोरूमचे उद्घाटन असो किंवा रक्तदान शिबिर असो, सध्या नगरपालिकेच्या निवडणुकांना शासनाने पुढे ढकलल्यामुळे सध्या पालिकेचा हा जाहिरात विभागाचा काम करणारा अतिक्रमण हटाव विभाग सुस्तावला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा कारभार अक्षरशः असून नसल्यासारखाच. त्यामुळे कोणीही यावे आणि फ्लेक्स लावून जावे, असाच प्रकार सध्या सातारा शहर परिसरात पाहायला मिळतो आहे. रितसर पावती पैसे भरून घेत या फ्लेक्सवर पालिकेच्या वतीने स्टिकर लावण्यात येते. अन्यथा या फलकांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही आजपर्यंत करण्यात आले होते. यासाठी पालिकेचा अतिक्रमण विभाग मोठ्या हिरीरीने कार्यरत होता. मात्र सध्या अडवायचे कोणाला? जाऊद्या, आपले काय जाते? अशामुळे अक्षरशः फ्लॅटच्या, मोठया इमारतीपुढे पुढे उभारलेल्या लांबच लांब भिंतीमुळे अनेक ऐतिहासिक वास्तू नव्हे तर दिशादर्शक ही या फ्लॅटमध्ये गुरफटून गेले आहेत. त्यामुळे आता सामान्य नागरिक वाढदिवस कोणाचाही असू दे किंवा उद्घाटन कोणाचे असू दे, सदा न कदा हे फ्लेक्स या जागांवर लागलेलेच पाहायला मिळत असल्याने मनातून नाराजी आणि खंत व्यक्त करीत आहेत.
खरोखर सांगा या फ्लेक्सना का बर कायदेशीर कारवाईचा बडगा दाखवला जात नाही? शे- दोनशे रुपयांपासून दोन -पाच हजारापर्यंत उभारले जाणार आहेत .फ्लेक्स अक्षरशः ज्यांची लायकी नाही अशांनी उभारून स्वतःची केलेली चमकोगिरी यातून दिसून येते हेच म्हणावेसे वाटते. त्यातच हा कार्यकर्ता माझा हा कार्यकर्ता त्यांचा यामुळे कारवाई तरी कोणावर करायची, अशा प्रकारामुळे जाऊदे आपले काय जाते, असे म्हणत पालिकेचा विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता दाद तरी कोणाकडे मागायची, असाच प्रश्न सातारकरांना पडला आहे.


