maharashtra

गळफास घेवून तरूणाची आत्महत्या


Young man commits suicide by strangulation
महागाव ता. सातारा गावात राहत असलेल्या एका २७ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सातारा : महागाव ता. सातारा गावात राहत असलेल्या एका २७ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महागाव येथे राहत असलेला तरूण महेश माणिक चव्हाण वय २७ याने दि. ६ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास शेतातील बांधावर लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळु शकले नाही. यांची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.