देगांव ता. सातारा गावच्या हद्दीत राहत असलेले नितीन बबन कुंभार वय ४० यांच्या राहत्या घरात घुसून साहित्य, फर्निचर, शेतातील अवजारे, अन्न धान्य बाहेर फेकून दिले. या प्रकरणी ४ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : देगांव ता. सातारा गावच्या हद्दीत राहत असलेले नितीन बबन कुंभार वय ४० यांच्या राहत्या घरात घुसून साहित्य, फर्निचर, शेतातील अवजारे, अन्न धान्य बाहेर फेकून दिले. या प्रकरणी ४ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देगांव मधील नितीन कुंभार यांच्या राहत्या घरी दि. ५ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास अशोक नथु कुंभार, रविराज अशोक कुंभार, मनोज प्रकाश साळुंखे, प्रविण तात्याबा राजे सर्व रा. देगांव ता. सातारा हे घरात घुसले. त्यांनी घरातील पश्विमेकडील भिंत फोडून लोखंडी लोढय़ा पाडून वस्तुंचे, फर्निचर, व शेताची अवजारे, अन्नधान्य बाहेर फेकून दिले. यामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अशोक यांची आई रूक्मिणी व विकास राजे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. याबद्दल या चौघाविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.