maharashtra

पोलीस अंमलदार अमर काशिद यांच्या तत्परतेमुळे हरवलेला मोबाईल मिळाला

मोबाईल धारकाने केले पोलीसांचे कौतुक

Due to the promptness of police officer Amar Kashid, the lost mobile was found
वाहतूक नियंत्रण शाखेतील वाहतूक पोलीस अंमलदार अमर काशिद पोवई नाका, सातारा येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या कडेला एक ओपो कंपनीचा मोबाईल बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता मोबाईल मधील सिमकार्ड वरुन हा मोबाईल केन्नी आतनी पाथापील्ली मुळ रा. केरळ सध्या रा. वेणेगाव फाटा खोडद निरसराळे ता.जि. सातारा यांचा असल्याची खात्री करुन मोबाईलचे मुळ मालक यांच्या ताब्यात दिला.

सातारा : वाहतूक नियंत्रण शाखेतील वाहतूक पोलीस अंमलदार अमर काशिद पोवई नाका, सातारा येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या कडेला एक ओपो कंपनीचा मोबाईल बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता मोबाईल मधील सिमकार्ड वरुन हा मोबाईल केन्नी आतनी पाथापील्ली मुळ रा. केरळ सध्या रा. वेणेगाव फाटा खोडद निरसराळे ता.जि. सातारा यांचा असल्याची खात्री करुन मोबाईलचे मुळ मालक यांच्या ताब्यात दिला.
मोबाईल धारकाने अमर काशिद यांचे आभार मानून पोलीस हे तत्परतेने समाजाची सेवा करत आहेत. पोलीस आहेत म्हणून सर्व ठिक आहे, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. काशिद यांच्या या कामगिरीबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी अमर काशिद यांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.