duetothepromptnessofpoliceofficeramarkashidthelostmobilewasfound

esahas.com

पोलीस अंमलदार अमर काशिद यांच्या तत्परतेमुळे हरवलेला मोबाईल मिळाला

वाहतूक नियंत्रण शाखेतील वाहतूक पोलीस अंमलदार अमर काशिद पोवई नाका, सातारा येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या कडेला एक ओपो कंपनीचा मोबाईल बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता मोबाईल मधील सिमकार्ड वरुन हा मोबाईल केन्नी आतनी पाथापील्ली मुळ रा. केरळ सध्या रा. वेणेगाव फाटा खोडद निरसराळे ता.जि. सातारा यांचा असल्याची खात्री करुन मोबाईलचे मुळ मालक यांच्या ताब्यात दिला.