maharashtra

अनोळखी महिलेचा मृत्यू


Death of an unknown woman
शहरातील नगर वाचनालयाच्या पार्किंगमध्ये मिळून आलेल्या एका अनोळखी ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा : शहरातील नगर वाचनालयाच्या पार्किंगमध्ये मिळून आलेल्या एका अनोळखी ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरात नगर वाचनालयाच्या आवारात ५५ वर्षीय महिला मिळून आली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या मृत्यूची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.