maharashtra

चालकाचा ताबा सुटल्याने सातारा पोलीस व्हॅनला अपघात

चालकासह तीन पोलीस जखमी; वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

Satara police van crashes after driver loses control
पुणे-सातारा महामार्गा वरुन सातारच्या दिशेने भरघाव वेगात येणार्‍या सातारा पोलीस दलातील शासकीय वाहन असलेली पोलीस व्हॅन हि गुरुवार दि.7 रोजी ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु.एम.ओ. कंपनीसमोर आली. तेथे दुभाजकाला जावुन धडकुन झालेल्या भीषण अपघातात तीन पोलीस जखमी झाले आहेत.

वाई : पुणे-सातारा महामार्गा वरुन सातारच्या दिशेने भरघाव वेगात येणार्‍या सातारा पोलीस दलातील शासकीय वाहन असलेली पोलीस व्हॅन हि गुरुवार दि.7 रोजी ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु.एम.ओ. कंपनीसमोर आली. तेथे दुभाजकाला जावुन धडकुन झालेल्या भीषण अपघातात तीन पोलीस जखमी झाले आहेत.
व्हॅनवर चालक असलेले शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे पुणे येथील श्‍लोक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. व्हॅनमध्ये असणारे सहाय्यक फौजदार महाघरे, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नं. 709 नलवडे हे दोघेजणही किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सातारा पोलीस दलातील वाहन क्रमांक एम.एच.11 ए.बी.8245 या पोलीस व्हॅनचे चालक असलेले पोलीस हवलदार शिंदे हे सहाय्यक फौजदार महाघरे, पोलीस कॉन्स्टेबल नलवडे असे तिघेजण शासकीय कामासाठी पुणे येथे गेले होते. तेथील कामकाज उरकुन हे तिघेही पोलीस व्हॅनमधून पुन्हा गुरुवार दि. 7 रोजी दुपारच्या वेळेस पुन्हा पुणे सातारा महामार्गावरुन सातार्‍याच्या दिशेने भरघाव वेगात येत असताना त्यांची पोलीस व्हॅन महामार्गावरील ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु.एम.ओ.कंपनी समोर आली. त्यावेळी चालक असलेले शिंदे यांचा वेगावरील ताबा सुटल्याने व्हॅन महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकुन झालेल्या भीषण अपघातात पोलीस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावेळी चालक असलेले पोलीस हवलदार शिंदे यांचा वेगावरील ताबा सुटल्याने व्हॅन महामार्गाच्या दुभाजकाला जावुन धडकुन झालेल्या भीषण अपघातात पोलीस व्हॅनच्या पुढील बाजुच्या सर्व काचा फुटल्याने महामार्गावर काचांचा खच पडला होता, तर पोलीस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. या अपघाताची नोंद शिंदेवाडी पोलीस चौकीत झाली आहे.