maharashtra

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा


Crime against a woman for financial fraud
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, आम्ही त्यातून चांगले पैसे मिळवून देतो, असे सांगून सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शंकुतला गायकवाड (रा. सदरबझार) या महिलेविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, आम्ही त्यातून चांगले पैसे मिळवून देतो, असे सांगून सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शंकुतला गायकवाड (रा. सदरबझार) या महिलेविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी युनुस बालेखान पठाण (वय 40, रा.आदर्की बु. ता.फलटण) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.