एकाला दुचाकीने धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेणखताची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून कडववाडी चा युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अभिजीत उमेश चव्हाण वय 19 असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात" राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी "निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.
येथील पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जगन्नाथ जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या वतीने सेवा सोसायटी व व्यक्तिगत कर्ज वितरणाच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के कपात केल्याची घोषणा केली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आणि बँकेचे इतर सर्व संचालक उपस्थित होते.
दारु दे नाहीतर तुला आणि तुझ्या बार मालकाला जिवे मारेन’, अशी धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड बसस्थानकानजीक असलेल्या सिटी ईन बार व देशी दारू दूकाना समोर पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या तडीपार गुन्हेगार यूवकावर पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.