येथील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामात कृषी विभागाने छापा टाकून सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये १ हजार २२ क्विंटल बियाणे तसेच एकूण २ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील तांबवे ता.फलटण येथील गावाच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी लोणंद पोलीसात दाखल करण्यात आल्या असून दोन्हीकडील सुमारे १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक बरोबरच शिक्षकांचे अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेने सुद्धा कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची सुद्धा अंमलबजावणी महाराष्ट्र दिन एक मे पासून सुरू झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना काळातील भारतातील मृत्यूंची आकडेवारी नुकतीच जाहीर केली या आकडेवारीत भारतातील सुमारे ४७ लाख नागरिक मरण पावल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रत्यक्षात मोदी सरकारने खोटी आकडेवारी प्रसिध्द करून जनतेची फसवणूक केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "राजभवन" महाबळेश्वर याठिकाणी भेट घेतली. हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी
कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय सातारा जिल्हयातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेऊ नये. साखर आयुक्तांनी तशा स्पष्ट सूचना कारखान्याच्या अध्यक्षांना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला. प...
एमएसईबी पतसंस्था, फलटण शाखेत 27 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरीष्ठ लिपीकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.