maharashtra

एमएसईबी पतसंस्था, फलटण शाखेत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरीष्ठ लिपीकावर गुन्हा


Crime against former senior clerk for embezzling
एमएसईबी पतसंस्था, फलटण शाखेत 27 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरीष्ठ लिपीकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : एमएसईबी पतसंस्था, फलटण शाखेत 27 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरीष्ठ लिपीकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी सातारा जिल्हा सेवकांची सह. पतसंस्थेच्या फलटण शाखेत 2020-21 या आर्थिक वर्षात संजय शिवलिंग आप्पा तोडकर (रा. गौरीशंकर सोसायटी, अर्कशाळेच्या मागे, शाहूपुरी, सातारा) हे वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होते. याच वर्षी कार्तिकस्वामी तुळशीराम गुरव या कर्जदार सभासदाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांना फलटण शाखेकडे जमा असणारी शेअर्स रक्कम, वर्गणी व इतर देय रकमा धनादेश स्वरुपात दिल्या. मात्र यामध्ये त्यांना ज्यादा वसुल असणार्‍या कर्जाची रक्कम देण्यात आली नव्हती. ही 27 हजार 800 रुपये ही रक्कम व्हाऊचरवर गुरव यांची खोटी सही मारुन तोडकर याने स्वत:च्या खात्यात जमा केली होती. ही सर्व बाब पतसंस्थेच्या फलटण शाखेचे चार्टड अकाऊंटंट मयुर प्रकाश माने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यासंबंधी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संजय तोडकर यांच्यावर 27 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप येळे करीत आहेत.