maharashtra

अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवा

हिंदू एकता आंदोलन कार्यकर्त्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

Stop the exaltation of Afzal Khan's tomb
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "राजभवन" महाबळेश्वर याठिकाणी भेट घेतली. हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी

सातारा : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "राजभवन" महाबळेश्वर याठिकाणी भेट घेतली. हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी अशा सुचना महामहिम राज्यापाल यांनी महाराष्ट्र शासनाला कराव्यात अन्यथा हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रभर आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या अफजल खान रुपी राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी कोथळा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भिमरुपी भीम पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात नोंदली गेली दुर्दैवाने आज त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न काही धर्मांधांकडून केला जात आहे अशा समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाला आपण कराव्यात व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची आदेशाची अंमलबजावणी व्हावी असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी महामहिम राज्यपाल यांच्याकडे व्यक्त केले.
यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उप जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, कार्याध्यक्ष हिंदू एकता राहुल यादव, हिंदू एकता शहराध्यक्ष प्रकाश जाधव, शानबाग (सर), करवडी उपसरपंच हिंदू एकता हिंदुराव पिसाळ ,पाटण तालुकाध्यक्ष हिंदू एकता गणेश पाटील, अजय पावसकर, सागर काळे, गणेश माने, महेश डांगे यावेळी उपस्थित होते.