गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असूनही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पाणी अनेक प्रकारे सांगली जिल्ह्यात जात आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नेते पक्षीय मतभेद विसरून पाणी प्रश्नावर एकत्र येत असताना सातारा जिल्ह्यातील नेते एकत्र येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावे अद्यापही वंचित आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 9 हजार 117 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी 1 हजार 412 प्रकरणे निकाली निघाली तसेच वादपूर्व 5 हजार 477 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी तडजोडीने 1 हजार 466 प्रकरणे निकाली निघाली आहेत. 2 मे ते 6 मे 2022 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्हमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 609 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली
संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडूज विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय चेहरा असलेल्या शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलच्या शिट्टीने बारा जागा जिंकून दहा वर्षाने परिवर्तन करून बाजी मारली. कपबशीला एका जागी यश मिळाले.
किसनवीर कारखाना निवडणुकीत केलेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर आमदार मकरंद आबा पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. जलमंदिर येथे मकरंद आबा यांना पाहताच खा. उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये ‘जिल्ह्याचे बॉस आले’ असे म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सातारा येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कांगा कॉलनी येथे एकाने दुचाकी पेटवून दिल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मालगाव, ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कोरेगाव, ता. कोरेगाव येथील एका महिलेने फोटो काढण्याच्या कारणावरून चिडून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
येथील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामात कृषी विभागाने छापा टाकून सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये १ हजार २२ क्विंटल बियाणे तसेच एकूण २ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.