maharashtra

सातारा येथे दुचाकी पेटवली; ४० हजार रुपयांचे नुकसान


Two-wheeler set on fire in Satara
सातारा येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कांगा कॉलनी येथे एकाने दुचाकी पेटवून दिल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कांगा कॉलनी येथे एकाने दुचाकी पेटवून दिल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ मे रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कांगा कॉलनी येथे तेथीलच महेश मोरे याने दुचाकी क्रमांक एम. एच.११ सीएच ०४८१ पेटवून दिल्याने त्यामध्ये ४० हजार रुपयांचे नुकसान झाले अशी तक्रार संजय दशरथ जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.