maharashtra

वडूज सोसायटीत शिट्टीने वाजविले 'बारा', कपबशीला एक ठिकाणी यश  


Whistle blows in Vaduj society
संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडूज विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय चेहरा असलेल्या शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलच्या शिट्टीने बारा जागा जिंकून दहा वर्षाने परिवर्तन करून बाजी मारली. कपबशीला एका जागी यश मिळाले.

सातारा : संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडूज विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय चेहरा असलेल्या शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलच्या शिट्टीने बारा जागा जिंकून दहा वर्षाने परिवर्तन करून बाजी मारली. कपबशीला एका जागी यश मिळाले.
सर्वसाधारण कर्जदार सभासद प्रतिनिधी  गोडसे प्रताप मानसिंग(५८३)काळे चंद्रकांत बाळकृष्ण(५८१)गोडसे शिवाजी भाऊ(५८१)गोडसे प्रमोद संभाजी(५६९)पवार महेश जोतीराम( ५५६)गोडसे मानसिंग नारायण(५३९)काळे गोविंद किसन(५२९) राखीव मतदार संघकाळे ताई किसन(५४०) गोडसे कल्पना चंद्रहार (५८३) इतर मागास प्रवर्ग मतदार संघराऊत हणमंत बबन (६४०)विमुक्त जाती भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदार संघकाळे हरिशचंद्र बजीरंग(६१९)अनुसुचित जाती /जमाती मतदार संघ
खुडे विजय बजरंग(६१०) असे उमेदवार निवडून आले.तर सत्ताधारी पॅनेलचे गोडसे महादेव सिताराम (बबन आप्पा) (५०५) यांची कपबशी फक्त तरली.    
शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलचे बारा उमेदवार निवडून आल्याचे समजताच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत वडूज नगरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्व मंदिराला भेट देऊन विजयी उमेदवारांनी देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी विश्वासराव काळे, सचिन माळी, अशोकराव गोडसे,  शशिकांत पाटोळे, जयवंतराव पाटील,संभाजी गोडसे,पृथ्वीराज गोडसे, निलेश गोडसे, युवराज पाटील, राहुल सजगणे, संजय काळे,प्रकाश पाटील, भरत घनवट व इतर शेतकरी सभासदांनी जल्लोष केला. दहा वर्षाने वडूज विकास सोसायटी मध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. आता चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मतमोजणीच्या ठिकाणी पत्रकारांना सुरुवातला पोलिसांनी प्रवेश देण्यास मज्जाव केला होता. परंतु, खटाव सहाय्यक निबंधक श्रीमती विजया बाबर यांच्या सूचनेनुसार पत्रकारांना मोबाईल घेऊन न जाता या अटीवर प्रवेश देण्यात आला.