दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नलिनी अंकुश कांबळे, वय ४७, रा. सरताळे, ता. जावली ही महिला दुचाकीवरुन जात असताना चक्कर येऊन दुचाकीवरून खाली पडून जखमी झाली होती. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हिचा मृत्यू झाल्याची खबर डॉक्टर संजय साठे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली.


