कोरेगाव, ता. कोरेगाव येथील एका महिलेने फोटो काढण्याच्या कारणावरून चिडून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सातारा : कोरेगाव, ता. कोरेगाव येथील एका महिलेने फोटो काढण्याच्या कारणावरून चिडून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ मे रोजी सौ. अनिसा अकील बेग, वय २५, रा. वनवासवाडी (खेड) ता. सातारा या महिलेने फोटो काढण्याच्या कारणावरून चिडून जाऊन स्वतःच्या घरात गळफास लावून घेतला होता. तिला तात्काळ सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना दि.५ रोजी तिचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.


