शिक्षक बँकेच्या व्याजदरात कपात
संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची एक मे पासून अंमलबजावणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक बरोबरच शिक्षकांचे अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेने सुद्धा कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची सुद्धा अंमलबजावणी महाराष्ट्र दिन एक मे पासून सुरू झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक बरोबरच शिक्षकांचे अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेने सुद्धा कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची सुद्धा अंमलबजावणी महाराष्ट्र दिन एक मे पासून सुरू झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे व उपाध्यक्ष महिंद्रा उघडे यांनी संपूर्ण ताळेबंद याचा आढावा घेऊन दीर्घ मुदत कर्ज, वाहन तारण कर्ज, घर बांधणे किंवा घर खरेदी करणे तसेच शैक्षणिक कर्ज यांची व्याजदर कमी करण्यासंदर्भात भूमिका मांडली. या भूमिकेला संचालक मंडळाने तात्काळ मान्यता दिली. नवीन धोरणानुसार दीर्घ मुदतीचे कर्ज साडेदहा टक्के, आकस्मिक कर्ज अकरा पॉइंट 90 टक्के, घरबांधणी कर्ज साडेआठ टक्के, वाहन तारण कर्ज साडेआठ टक्के, शैक्षणिक कर्ज साडेसात टक्के दराने देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नवीन व्याजदर हे एक मे पासून लागू होणार आहेत. दरम्यान चालूवर्षी शिक्षक बँकेला सात कोटी 56 लाखाचा नफा झाला असून यावर्षी सभासदांना चांगला लाभांश मिळणार आहे. कमी व्याजदरात कर्ज व सलग सात वर्षे 10 टक्के लाभांश यामुळे सभासदांना आनंद व्यक्त होत आहे. यावेळी संचालक मोहन निकम, बंडोबा शिंदे, राजकुमार जाधव, अनिल शिंदे, गणेश तोडकर, भगवान धायगुडे, तुकाराम कदम, दत्ता कोरडे, शंकर जांभळे, ज्ञानेश्वर कांबळे, वैशाली जगताप, चंद्रकांत आखाडे, राजाराम खाडे, निर्मला बस आगरे अधिकारी छगन खाडे उपस्थित होते. शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजेंद्र घोरपडे आणि या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


