maharashtra
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच ठार
गमेवाडी गावच्या हद्दीतील घटना
शेणखताची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून कडववाडी चा युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अभिजीत उमेश चव्हाण वय 19 असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
चाफळ : शेणखताची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून कडववाडी चा युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अभिजीत उमेश चव्हाण वय 19 असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
गमेवाडी गावच्या हद्दीत ,आंबोळकी नावाच्या शिवारा नजीक असलेल्या वळणावर वाघजाई वाडी येथून कोपर्डे येथे ट्रॅक्टर शेणखत घेऊन निघाला होता. ट्रॉलीवर बसलेल्या अभिजीतचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला. यावेळी ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने अभिजीत हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच चाफळ दूरक्षेत्राचे मनोहर सुर्वे सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


