maharashtra

पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय जाधव बिनविरोध


Santosh Jadhav as President of Pusegaon Seva Society and Vijay Jadhav as Vice President without any objection
येथील पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जगन्नाथ जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

पुसेगाव : येथील पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जगन्नाथ जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडी संपन्न झाल्या असून यावेळी माजी चेअरमन लक्ष्मणराव जाधव, दिलीपराव जाधव, ज्येष्ठ नेते गुलाबराव वाघ, सतीशकाका जाधव, नूतन संचालक रामचंद्र नाथा जाधव, संतोषशेठ तारळकर, अमित जाधव, उमेश शेडगे, प्रशांत कुलकर्णी, शंकर वसंत जाधव, संगिता जाधव, सुनिता वाघ, दीपकराव मदने, वसंतराव मखरे, बाळकृष्ण सर्जेराव जाधव, सोसायटी सचिव राहूल साळुंखे इत्यादी उपस्थित होते.