maharashtra

अस्तित्व लपवल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


All three charged with concealment of existence
अस्तित्व लपवल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ मे रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास संगम नगर कॅनॉलच्या शेजारी यश वडापाव सेंटर नजिक सोहेल जैनुद्दीन संदे, वय २१, रा. तांबवे, ता. कराड, प्रदीप धनाजी चव्हाण, वय २१, आकाश बापू पवार, वय २५, रा. चंदन नगर, कोडोली, ता. सातारा हे तीन जण आपले अस्तित्व लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या आढळून आल्याची तक्रार पोलीस नाईक अभय अशोक साबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.