maharashtra

कला व वाणिज्य महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी कार्यक्रम संपन्न


Rajshri Shahu Maharaj Smriti Shatabdi program held at Arts and Commerce College
पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात" राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी "निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.

पुसेगाव : पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात" राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी "निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार विजय मांडके म्हणाले, "बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही व त्यांच्यातील मागासलेपणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव होय. हीच गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला" सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यासाठी कोल्हापूर येथे वसतीगृहाची स्थापना केली. प्राथमिक शाळेतील फी माफी ची घोषणा केली व जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी समानतेने वागावे असे आदेश काढले. त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे "वेदोक्त प्रकरण"  घडले तेथूनच पुढे खऱ्या अर्थाने ब्राह्मणेत्तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ .संजय क्षीरसागर म्हणाले, "शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणाच्या क्रांती बरोबर संगीत, नाट्य, चित्रकला आदी कलावंतांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली असे विचार व्यक्त केले."
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त विद्यार्थी व प्राध्यापक यांनी कृतज्ञता पर्व वंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ .अनिल जगताप यांनी केले सूत्रसंचालन प्रा. श्रीमती सोनार एम.बी. यांनी केले. आभार प्रा. धोंगडे एस. आर. यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.