maharashtra

दारुच्या पैशावरुन बार मालकाला जिवे मारण्याची धमकी


Threats to kill bar owner over liquor money
दारु दे नाहीतर तुला आणि तुझ्या बार मालकाला जिवे मारेन’, अशी धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : दारु दे नाहीतर तुला आणि तुझ्या बार मालकाला जिवे मारेन’, अशी धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबा ओव्हाळ, बंटी गायकवाड, तन्वीर शेख व अन्य अनोळखी एक (सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष रामदास मिरगे (वय 35, रा. कोडोली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे  परमिट रूम व बिअरबार आहे. या बारमध्ये संशयित चौघे गेले व त्यांनी एकदा दारु पिली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत. संशयित चौघे पुन्हा दि. 4 रोजी बारमध्ये गेले. यावेळी त्यांनी पहिले बिल दिले नसल्याने त्यांना दारु देण्यास नकार दिला गकेला. त्यामुळे या चौघांनी चिडून धमकी दिली. तसेच तू आम्हाला दारु दिली नाहीस, तर तुला व तुझा मालक संतोष मिरगे यांना ठार मारेन, तसेच तोडफोडही करेन, अशी दमदाटी केली. या प्रकारानंतर बार मालक मिरगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.