maharashtra

वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता


Two young women go missing from Wai taluka
वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ मे रोजी ८.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान जांब, ता. वाई येथून एक युवती एका मेडिकलमध्ये कोर्स करिता महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेली, ती अद्याप घरी न आल्याची तक्रार तिच्या पालकांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. ४ मे रोटी ११.४५ वाजण्याच्या सुमारास सह्याद्रीनगर, ता. वाई  येथून एक मुलगी वाई येथील एका हॉस्पिटल मध्ये जाते असे सांगून निघून गेली ती अद्याप परत आल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.