maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one person for causing death
एकाला दुचाकीने धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : एकाला दुचाकीने धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ मे रोजी ६.३० ते दि. ५ मे रोजी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पाटखळ माथा ते लिंब जाणाऱ्या रस्त्यावर बसाप्पाचीवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत अतुल अंकुश सावंत, वय २७, राहणार लिंब हा दुचाकी वरून सातारा येथून लिंबकडे येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार शशिकांत मधुकर सावंत यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.