रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एका मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
उडतारे, ता. वाई परिसरात असणाऱ्या कुडाळी नदीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जैतापुर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते.
फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.
शेतीअवजारे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उद्या आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरही जीएसटी लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब हेच का आपले अच्छे दिन ! असा थेट सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निवेदनाद्वारे केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण जाहीर केल्यामुळे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने येथील पोवई नाका येथे साखर आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
दांडेघर, ता. महाबळेश्वर येथील डोंगराला अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगराशेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.