सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात आल्याची माहिती समजताच आज शहर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात इम्पिरीकल डेटा केंद्र शासनाने द्यावयाचा आहे, असे सांगण्यात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष घालवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा त्यांचा डाव होता. विशेषतः यामध्ये महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आघाडीवर होता, अशी घणाघाती टीका आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली.
झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत त्यांचे हे नवीन ढोंग माजगावकर माळ काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टी सदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे अशी खरमरी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली आहे
अंजली कॉलनीमधील बांधकामावरून पत्र्याच्या शेडमधून सेंट्रींगच्या प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली आहे.
शहर व परिसरातून दुचाकी चोरणार्या सराईत चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) सापळा रचून अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुप्तधनाच्या हव्यासापोटी चार वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात एका मुलीचा खून झाल्याची थरकाप उडविणारी घडना घडली होती. या खुनाचा उलगडा करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी या मुलीच्या आजीसहीत चारजणांना अटक करण्यात आली आहे.
सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासूर गँगमधील सात जणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून पंचवीशीच्या आतील युवक आहेत.
बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता शहराबरोबर हद्द वाढीची जबाबदारी सातारा पालिकेवर आली आहे. यंदा कास धरणाची उंची वाढल्याने सातारकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. येत्या वर्षभरात सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणीयोजना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारी उपक्रमशील ग्रंथालये ही काळाची गरज आहे. उपक्रमशील ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कार द्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्याशाळा शालेय समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी थोरात यांनी केले.