महात्मा फुले यांनी तीन प्रकारे कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे.
अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यात समाजविघातक ज्या घटना मुद्दामपणे घडवल्या जात आहेत.
महाबळेश्वर सह पाचगणीची जैवविविधता तसेच निसर्ग सौंदर्य टिकलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर स्थानिक भूमीपुत्रांवरही अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज संध्याकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली.
वोटर्स सर्च वेबसाईट दुरुस्त करून नागरिकांमधील संभ्रमावस्था कमी करावी, अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्याकडून करण्यात आली.
लक्ष्मी देवीचे घरी आगमन व्हावे म्हणुन वसुबारस या दिवशी सातारा जिल्ह्यात सुवासिनीनी गाय-वासराची हळद कुंकू वाहत पुजा केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने 70 वर्षीय वृध्दाला पकडून त्याच्याकडून गांजा जप्त केला.
पाटखळ माथा ते वाठार रस्त्यावर पाटखळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल अनिल साबळे (वय 21, रा. वडूथ ता.सातारा) हा युवक ठार झाला.
सातारा शहर परिसरातील मल्हार पेठ व धनगरवाडी येथून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत.
जुन्या वादाच्या कारणातून पाचशे एक पाटी, सातारा येथे जैन अस्लम शेख (वय 20, रा.नकाशपुरा पेठ, सातारा) याने साहील फिरोज शेख (वय 29, रा. शनिवार पेठ, सातारा) यांना मारहाण केली.
गोडोली, सातारा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी संशयितांकडून 3220 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.