maharashtra

चारचाकी गाडीची चोरी


संगमनगर येथून अज्ञात चोरट्याने चार चाकी गाडीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : संगमनगर येथून अज्ञात चोरट्याने चार चाकी गाडीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान उमेश खिमजीभाई पटेल रा. संगमनगर, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली दोन लाख रुपये किमतीची ईरटीका गाडी क्र. एमएच 11 बीव्ही 4036 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.