सातार्यातील प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसून घरगुती साहित्याचे मात्र नुकसान झाले आहे.
सातारा : सातार्यातील प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसून घरगुती साहित्याचे मात्र नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाचे वाहन तात्काळ आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी रात्री प्रतापगंज पेठेतील एसबीआय बँकेसमोरुन अचानक धूर येवू लागला. पाहता-पाहता आग लागल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. प्रथामिक माहितीनुसार घरामध्ये शॉर्ट सर्कीट झाल्याने ही आग लागली. घटनेनंतर तात्काळ याची माहिती अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी मदतची हात दिला. अग्निशामक दलाचे वाहन आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती.


