प्रतापसिंह उद्यानातून अज्ञात चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : प्रतापसिंह उद्यानातून अज्ञात चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक ते दोन नोव्हेंबर दरम्यान सातारा येथील राजवाडा येथे असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानातून अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


