सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी 6 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी 6 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी वडूथ, ता. सातारा येथे वडूथ- तासगाव जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याचे शेडच्या पाठीमागे दीपक बाळकृष्ण चौधरी रा. रविवार पेठ, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 610 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत सदर बाजार सातारा येथील वस्ताद मैदानाच्या टाकीजवळ निलेश नंदकुमार मोरे रा. करंजे पेठ, सातारा यांच्याकडून नऊशे रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत कोडोली ग्रामपंचायत कमानी समोर असलेल्या फळाच्या गाडीच्या आडोशाला शैलेश शंकर देशमुख रा. कोयना सोसायटी सदर बाजार सातारा, सचिन कृष्णा देशमुख रा. कोडोली सातारा, अजय आरकडे रा. अमरलक्ष्मी, सातारा यांच्याकडून 5130 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


