सातारा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांसाठी दिवाळीनिमित्त ’दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रम तसेच ‘राष्ट्रीय विधी सेवा दिन’ साजरा करण्यात आला.
सातारा : सातारा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांसाठी दिवाळीनिमित्त ’दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रम तसेच ‘राष्ट्रीय विधी सेवा दिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन सातार्यातील ‘भारतीय सेवक संगती’ या संस्थेमार्फत करण्यात आले होते. यामध्ये विविध मराठी व हिंदी गाण्यांचा आस्वाद बंद्यांनी घेतला. गायकांकडून बंद्यांना स्फुरण मिळावे आणि ते गुन्ह्यांपासून परवृत्त व्हावेत, अशा अचूक गाण्यांची निवड करण्यात आली होती.
दरम्यान, ’राष्ट्रीय विधी सेवा दिन’ साजरा करताना न्यायाधीश व सचिव तृप्ती जाधव यांच्यासह वकील मंडळी उपस्थित होती. यावेळी बंद्यांना शासनामार्फत मोफत वकील मिळवून देऊन त्यांना न्याय मिळवून दिला जातो, याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे तसेच ‘भारतीय सेवक संगती’चे पदाधिकारी, कारागृहातील पोलीस उपस्थित होते.


