maharashtra

ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडल्याने एकाचा मृत्यू


ट्रॅक्टर ट्रॉलीतून तोल जाऊन खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : ट्रॅक्टर ट्रॉलीतून तोल जाऊन खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक आठ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कामठी पोस्ट वेळे तालुका सातारा येथील किसन बाबुराव चव्हाण हे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये गवत भरत असताना तोल खाली जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.