maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


सातारा शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील 14 वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. याप्रकरणी मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 नोव्हेबर रोजी घडली आहे.