शिखर शिंगणापूर, ता. माण येथील मंदिर परिसरातुन अज्ञात चोरट्याने ९ हजार २०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शिरळ, ता. पाटण येथील घरातून व शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे ८० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली असल्याची तक्रार कोयना नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
उंब्रज, ता. खटाव येथून एकाने ९ हजार रुपये किमतीचे १० लोखंडी अँगलचे नग चोरून नेण्याची तक्रार इंग्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोरखपुर,(पिरवाडी) ता. सातारा येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची खबर संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्यामुळे अनेक मुले-मुली परदेशात शासन- प्रशासनात उच्चपदावर पोहचले, असे विद्यार्थीप्रिय प्रा. सुनील वाघमारे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने सातारा येथे निधन झाले.
मतांचा सर्वात मोठा सौदा होऊन विश्वासघात होत असताना सर्व जनता गप्प राहिली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेच्या मतांचा सौदा करणे हा राज्यकर्त्यांचा अधिकार असल्याची प्रथा आपण प्रस्थापित केली आहे. याची प्रत्येक नागरिकाला लाज वाटली पाहिजे, असे स्पष्ट मत महात्मा गांधींचे पणतू, लेखक, सामाजिक कार्यकर्ते व गांधी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे मोकळ्या जागेच्या वादाच्या कारणातून दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
मर्चंट नेव्हीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण्यातील दाम्पत्यासह सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घरात घुसून जबरी चोरी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.