कार चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पिरवाडी (खेड), ता. सातारा येथील तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील सदरबझार परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7 लाख 54 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वनविभाग व आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे अमिष दाखवून सातारा व मुंबई येथील पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदकुमार शिंदे, रा. बोरगाव, ता. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निलंबन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी मनोहर कदम यांनी येथील सदरबझार परिसरात असणार्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले.
सातारा शहरातील मोळाचा ओढा रस्त्यावरील तामजाईनगर येथील घोरपडे बेकरीज या बेकरीच्या दुकानास सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात ट्रक चालक केबिनमध्येच अडकून राहिले. तब्बल तासभर अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. पोलिसांच्या सहकार्याने क्रेनने चालकास बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर सध्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कास पठार परिसरातील बांधकामे अधिकृत करण्यात यावीत, याबाबत सर्व हॉटेल व्यवसाय, चालक-मालक, कामगार कास पठार विभाग, सातारा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे मागणी केली आहे.
शिवसेना सातारा जिल्हा प्रमुखपदी पुसेगावचे निष्ठावान शिवसैनिक प्रताप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कराड, ता.कराड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.