शिवसेना सातारा जिल्हा प्रमुखपदी पुसेगावचे निष्ठावान शिवसैनिक प्रताप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पुसेगाव : शिवसेना सातारा जिल्हा प्रमुखपदी पुसेगावचे निष्ठावान शिवसैनिक प्रताप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रताप जाधव हे सन १९९८ पासून शिवसेनेत काम करीत आहेत. शिवसेनेत यापूर्वी पुसेगाव शहरप्रमुख, खटाव तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख या पदावर निष्ठेने काम केले आहे. पुसेगाव येरळा पुल, जिहे कठापूर उपसा सिंचन योजना, ऊस दर, शेती विषयक, सामाजीक व महिलांसह विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला. जनहितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहेत. रास्ता रोको, आंदोलने केल्याने अनेकदा जेलमध्ये जवे लागले आहे. चंद्रकांत जाधव यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी प्रताप जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या काळात कोरेगाव, माण विधानसभा व सातारा जिल्ह्यात शिवसेना पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्यावर भर दिला जाणार असल्याचे नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सातारा टुडे शी बोलताना सांगितले.