चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन २०१५ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान सांबरवाडी, ता. सातारा येथे तेथीलच संदीप भालचंद्र फडतरे यांनी पत्नी सुमन फडतरे हिच्या चारित्र्यावर दारूच्या नशेत संशय घेऊन माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये असे म्हणत दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


