कार चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पिरवाडी (खेड), ता. सातारा येथील तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : कार चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पिरवाडी (खेड), ता. सातारा येथील तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी 2 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणार्या पुष्कर मंगल कार्यालयासमोर निखिल तानाजी कदम वय 32, रा. आरळे, ता. सातारा हे आपली कार यू टर्न घेत असताना त्या ठिकाणी अभि भिसे, अमीर मुजावर, अमीर शेख तिघेही रा. पिरवाडी (खेड) हे त्या ठिकाणी आले. त्यांनी निखिल कदम यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.