चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे मोकळ्या जागेच्या वादाच्या कारणातून दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे मोकळ्या जागेच्या वादाच्या कारणातून दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
मोकळ्या जागेच्या वादातून दि.२० रोजी ४ वाजण्याच्या सुमारास चिंचणेर वंदन येथे झालेल्या मारहाण प्रकरणी किरण अनिल बर्गे यांनी संभाजी मारुती बर्गे, तानाजी मारुती बर्गे, प्रतीक संभाजी बर्गे, तेजपाल तानाजी बर्गे या चौघाच्या विरोधात, तर संभाजी मारुती बर्गे यांनी आशा अनिल बर्गे, अनिल सोपान बर्गे, किरण अनिल बर्गे, प्रगती अनिल बर्गे यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे.


