maharashtra

विद्यार्थीप्रिय प्रा. सुनील वाघमारे यांचे निधन


महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्यामुळे अनेक मुले-मुली परदेशात शासन- प्रशासनात उच्चपदावर पोहचले, असे विद्यार्थीप्रिय प्रा. सुनील वाघमारे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने सातारा येथे निधन झाले.

सातारा : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्यामुळे अनेक मुले-मुली परदेशात शासन- प्रशासनात उच्चपदावर पोहचले, असे विद्यार्थीप्रिय प्रा. सुनील वाघमारे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने सातारा येथे निधन झाले.
त्यांच्यावर कृष्णा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्ष ५८ होते. त्यांच्या पश्चात आई, दोन बहिणी, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. स्मृतिशेष दलितमित्र गो. मा. वाघमारे यांचे ते सुपुत्र होते.
प्रा, सुनील वाघमारे महाराष्ट्रभर परिचित होते, सामाजिक,'सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर दिग्गज्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते, युवा पिढीला अचूक मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या मदतीला ते धावून जात असत. त्यांचा स्वभाव मनमोकळा आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारा असल्याने ते सर्वच ठिकाणी लोकप्रिय असे असणारे व्यक्तिमत्त्व होते.
मागील काही वर्षापासून ते आजारी होते. कोल्हापूर येथील शासकीय पोलिटेक्निक महाविद्यायातील आदर्श प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आजारपणामुळे ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन सातारा येथे वास्तव्यास आले होते. सोमवारी त्यांची तब्येत खालावली आणि अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने वाघमारे कुटुंबियांसह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.