सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची खबर संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची खबर संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ रोजी ६ वाजण्याच्या सुमारास हेळगाव, ता. कराड येथे प्रतीक्षा दिलीप भंडारे वय १९ या युवतीने दिलीप बापू भंडारे यांच्या घरी लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर रमेश संभाजी भंडारे यांनी कराड पोलीस ठाण्यात दाखल केली.
दुसऱ्या घटनेत दि.२३ रोजी ७ वाजण्यापूर्वी प्रतापसिंह नगर, (खेड) ता. सातारा येथे तेथीलच गणेश अंकुश शिवदास वय २७ मारुती मंदिरा शेजारी गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर शकुंतला अंकुश शिवदास यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तिसऱ्या घटनेत दि. २३ रोजी ७ वाजण्याच्या सुमारास नुने, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच सचिन अरुण कुर्लेकर वय ४५ यांचा विहिरीतील पाण्यात पाय घसरून विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर प्रभाकर शंकर कुर्लेकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


