maharashtra

शिरळ येथून सुमारे ८० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी


शिरळ, ता. पाटण येथील घरातून व शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे ८० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली असल्याची तक्रार कोयना नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

सातारा : शिरळ, ता. पाटण येथील घरातून व शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे ८० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली असल्याची तक्रार कोयना नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२२ ते दि.२३ ऑगस्ट दरम्यान शिरळ येथील विठोबाचा माळ नावाच्या शिवारात असणाऱ्या घरातून व शेतातून अज्ञात चोरट्याने शेतीपूरक असणारे ८० रुपयांचे साहित्य अज्ञात चरोट्याने चोरून घेण्याची तक्रार शंकर गंगाराम देवरूखकर यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात दिली.