दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोरखपुर,(पिरवाडी) ता. सातारा येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोरखपुर,(पिरवाडी) ता. सातारा येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते मुंबई रेस्टॉरंट मार्गावर जिल्हा न्यायालयानजिक विकास राजाराम यादव वय ६५, रा. सासपडे, ता. सातारा रस्ता ओलांडत असताना दुचाकी चालक प्रथमेश योगेश भोसले वय २२, रा. पिरवाडी, (गोरखपुर) ता. सातारा याने आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीडी ३८४७ ने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने याबाबतची तक्रार राजेंद्र नाना देशमुख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


