maharashtra

उंब्रज येथून लोखंडी अँगलची चोरी


उंब्रज, ता. खटाव येथून एकाने ९ हजार रुपये किमतीचे १० लोखंडी अँगलचे नग चोरून नेण्याची तक्रार इंग्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : उंब्रज, ता. खटाव येथून एकाने ९ हजार रुपये किमतीचे १० लोखंडी अँगलचे नग चोरून नेण्याची तक्रार इंग्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उंब्रज येथे महात्मा गांधी शाळेसमोर असणाऱ्या फॅब्रिकेशन दुकानासमोरून सुनील बाबा जावळे रा. कोर्टी, ता. कराड याने ९ हजार रुपये किमतीच  १० लोखंडी अँगलचे नग चोरून नेल्याची तक्रार अनिल वसंत बेडके यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.