पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान रामोशीवाडी, तालुका कोरेगाव नजीक डॉ. भिमराव भुतकर यांच्या आरोग्य ऊर्जालयासमोर दुपारी एक वाजता च्या दरम्यान वडाप काळी पिवळी महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच 11 एम 0954 व स्कॉर्पिओ क्रमांक एम एच 06 डब्लू 2223 समोरासमोर धडक झाली, यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत.
बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ढोल ताशांच्या दणदणाटात, गुलाल फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, पारंपारिक ढोलताशांच्या निनादात जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप दिला.
र्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दि.15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
जमिनीवर पाय असणारी आमची नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द आणि आपल्याला मिळालेली थेट आमदारकी हाच आपल्यामधील मूलभूत फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले होते. केलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी पालायन करायचे आणि पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची असले बिन कामाचा उद्योग बंद करा.
ठोसेघर येथील माने वस्तीमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जंगली श्वापदाने एका श्वानावर जोरदार हल्ला चढवल्यामुळे त्यात ते श्वान जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून ठोसेघर परिसरात एका वाघाचा वावर असल्याच्या जोरदार चर्चा घडत आहेत. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केला असल्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी परिसरात बीव्हीजी बिल्डिंगच्या आडोशाला जुगार घेताना सहा जण आढळून आले.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वडूज ते कोरेगाव एस.टी.मधुन प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील वाढे फाटा परिसरात अपघातात जखमी झालेल्या एकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.