यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्यावर वेल्डिंगचे काम करत असताना राजू वर्मा गुप्ता रा. उत्तर प्रदेश हा उंचावरून जमिनीवर खाली पडून जखमी झाला होता. त्याच्यावर कराड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा दि. ६ रोजी २.१५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.


