वडूज ते कोरेगाव एस.टी.मधुन प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : वडूज ते कोरेगाव एस.टी.मधुन प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काजल महेश नरूळे वय २७, रा. जोतिबाची वाडी (शाहूपुरी), सातारा ही महिला दि. ६ रोजी १२ वागण्याच्या सुमारास वडूज ते सातारा एस.टी. बसमधुन प्रवास करीत असताना कोरेगाव येथील आझाद चौक परिसरात अज्ञात चोरट्याने पर्समधुन दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


