पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान रामोशीवाडी, तालुका कोरेगाव नजीक डॉ. भिमराव भुतकर यांच्या आरोग्य ऊर्जालयासमोर दुपारी एक वाजता च्या दरम्यान वडाप काळी पिवळी महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच 11 एम 0954 व स्कॉर्पिओ क्रमांक एम एच 06 डब्लू 2223 समोरासमोर धडक झाली, यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत.
पुसेगाव : पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान रामोशीवाडी, तालुका कोरेगाव नजीक डॉ. भिमराव भुतकर यांच्या आरोग्य ऊर्जालयासमोर दुपारी एक वाजता च्या दरम्यान वडाप काळी पिवळी महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच 11 एम 0954 व स्कॉर्पिओ क्रमांक एम एच 06 डब्लू 2223 समोरासमोर धडक झाली, यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दहिवडीकडून सातारकडे जाणारी वडाप पॅसेंजर महेंद्रा पिकअप मध्ये सहा ते सात प्रवासी होते. भाटमवाडी वरून कोरेगावच्या दिशेकडून पुसेगावकडे येणारी स्कॉर्पिओ यांची रामोशीवाडी नजीक आरोग्य ऊर्जालायासमोर समोरासमोर धडक झाली, महिंद्रा पिकअपचे चालक वैभव लांबाटे महिमानगड तालुका मान व स्कॉर्पिओचे चालक राजेंद्र मगटराव बुधावले राहणार, भाटमवाडी, तालुका कोरेगाव हे जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर स्कॉर्पिओ ही अचानक विरुद्ध दिशेला गेल्यामुळे ती काळ्यापिवळ्या वडाप महिंद्रा पिकपवर आदळली व लगत असलेल्या शिवाजी शिरतोडे यांच्या माळरान शेतामध्ये गेली. अपघातस्थळी कोरेगाव पोलीस स्टेशनचे व पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित झाले होते. अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला घेण्यात आली आहे.


